जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून ‘अतुल वांदिले’ यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. शरद पवार साहेब यांनी घेतला आढावा ……!

 

हिंगणघाट :- मलक नईम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय खासदार मा.श्री शरदचंद्र पवार साहेब विदर्भात नागपूर येथे आले असता हॉटेल रँडिसन ब्लू येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क प्रमुख सुबोधजी मोहिते, प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांच्याकडून पक्ष संघटन वाढविण्याबाबत आढावा घेण्यात आला.
विदर्भात व वर्धा जिल्ह्यातील गावखेड्यापासून पक्ष मजबुत करण्याच्या दृष्टीकोनातून आढावा घेण्यात आला. यावेळी अतुल वांदीले यांनी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदि रेल्वे या भागात पक्षसंघटन मजबूत करीत, पक्षाला बळकट करन्यासाठी सूरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती सादर केली .वॉर्ड तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता अशा अनेक उपक्रम राबवित संघटनात्मक कामाची माहिती देखिल देण्यात आली. तालुक्यातील अनेक जागी कार्यकर्त्यांचा बैठकी घेत , येणाऱ्या नगर पंचायत, जिल्हा परिषद असो की नगर परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निवडणूक लढवेल आणि चांगल्या मताधिक्याने निवडून सुद्धा येतील. तसेच कार्यकर्त्यांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीसाठी बैठक देखिल पार पडली यासंदर्भात पक्षसंबधित जिल्ह्याचा आढावा खा. शरद पवार साहेब यांना दिला.
यावेळी माजी नगरसेवक प्रलय तेलंग, वर्धा जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अमोल बोरकर, सुनील भुते,प्रशांत घवघवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment