जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, lcb ची कारवाही

देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा केलेल्या कारवाईमध्ये तीन लाख ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून सदर जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून बारा जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे कारवाई केली आहे या कारवाईमध्ये आरोपी विनोद गणेश मेहेत्रे राहणार सिंदखेड राजा कोंडीबा रामभाऊ भोजने राहणार सिंदखेड राजा गुलाम नबी शेख नजीर राहणार जालना सय्यद मोसिन सय्यद कट्टू राहणार सिंदखेड राजा दिलीप गणपत ढोबळे राहणार सावखेड भोई सय्यद युसूफ सय्यद उस्मान राहणार देऊळगाव राजा सिद्धांत आनंदराव खांडेभराड राहणार देउळगाव राजा यांच्यासह अधिक सात आरोपी वर कायदेशीर कारवाई केली असून यातील पाच जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदर कारवाईमध्ये नगदी एक लाख १७ हजार पाचशे रुपये ७ मोबाईल सहा मोटर सायकल असा एकूण ३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा lcb पथकाने हस्तगत केला. या कारवाही साठी बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चवरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बुलडाणा आणि खामगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशाने पीएसआय शेळके, जिंदमवार, आढाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, गोरले, भुजबळ, भिसे यांनी केली आहे. याबाबत अधिक तपास देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संभाजी पाटील व श्रीकृष्ण गवई करीत आहेत.

Leave a Comment