टूनकी येथे खुलेआम रेती तस्करी सुरूच कारवाई मात्र शून्य , महसुल विभागाचा साफ दुर्लक्ष

0
693

 

(सुर्या मराठी न्युज ब्युरो)

अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू वाहतूक,सुरू,!!
अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी असताना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात अवैध्य वाळू वाहतूक सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे ,न्यायालयाने रेती उत्खणावर कठोर निर्बंध लादले आहेत मात्र न्याालयाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविली जाते, संग्रामपूर तालुक्यातील टूनकी सह अनेक ठिकाणी, मनमानी पद्धतीने रेती उपसा केला जात आहे, यावर फार मोठी कारवाई होताना दिसत नाही, दरवर्षी कोटी रुपयांची रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर तथा रेती साठा यावर कारवाई करण्यात आली होती परंतु आज मात्र तशी कारवाई होताना दिसत नाही, कारवाईचा आकडा सबंधित प्रशासनाकडून दाखवत स्वतःच्या पाठीवर शाबासकी ची थाप मारून घेण्यात प्रशासन मुषागुल असल्याचे बोलले जात आहे,अनेकदा पर्यावरण प्रेमी व समाज सेवकांनी थाठा वृत्तपत्र मीडिया चे बातम्या प्रसारित करूनही प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे, अशी नागरिकात चर्चा होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here