Home Breaking News ट्रक व रुग्णवाहिकेची अमोरा – समोर धडक – १ठार, १गंभीर जखमी

ट्रक व रुग्णवाहिकेची अमोरा – समोर धडक – १ठार, १गंभीर जखमी

548
0

 

BIG BREKING

नांदुरा / प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावरील आंबोडा फाट्यानजीक ट्रक व रुग्णवाहिकेच्या अमोरा समोर झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर च्या दुपारी २.३०वाजेदम्यान घडली
याबाबत अधिक वृत्त असे की बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयाची रुग्णवाहिका नागपूर ला पेशंट सोडून परतत असतांना आंबोडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने जबर धडक दिली या अपघातात रुग्णवाहिकेचे चालक गजानन राजेंद्र पाटील वय २५ वर्षे रा लालबाग, बऱ्हाणपूर हे जागीच ठार झाले तर रवींद्रसिंह बहाद्दरसिंह ठाकूर वय २४ रा वडनेर जोहरी, तालुका आस्था , जिल्हा सिहोर (म प्र ) हे गंभीररित्या जखमी झाले सदर अपघाताची माहिती मिळताच १०८ चे डॉ शेख , चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले यावेळी डॉ जैस्वाल , डॉ बेंडे यांनी तातडीने उपचार केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने जखमीला अधिक उपचाराकरीता मलकापूर येथे हलवीण्यात आले यावेळी पत्रकार प्रवीण डवंगे , शिवा घाटे,सोहेल भाई यांनी मदतकार्य केले

Previous articleमहाराष्ट्र एक्स्प्रेस न्यूज टीमकडून कर्तव्यदक्ष पाेलिसांचा सन्मान
Next articleरामाळा तलाव खोलीकरण-सौदर्यीकरण करीता इको-प्रो ची मुक निदर्शने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here