तहसील कार्यालय लोकप्रिय हनुमान मंदिरात समोरील संस्थेच्या सेवक निवास संकुलातील इमारतीमध्ये स्थलांतरित नागरिकांनी नोंद घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: शेगाव येथील तहसील कार्यालय हे हनुमान मंदिर व सप्तशृंगी देवी मंदिर समोर असलेल्या श्री संस्थानच्या सेवक निवास संकुलाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली आहे

शेगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी या बाबीची नोंद घेण्याचे आवाहन शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे याबाबत त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शेगाव तहसील कार्यालयाची नवीन इमारतीचे बांधकाम सुरू

असल्याने श्री संत गजानन महाराज संस्थान च्या श्री गजानन महाराज वाटिका चौकातील इमारतीमध्ये तहसील कार्यालय स्थलांतरित झाले होते मात्र श्री संस्थानच्या सेवा कार्य व इतर कार्यासाठी वाटिका चौकातील इमारतीचे आवश्यकता असल्याने सदर वाटिका चौकातील तहसील कार्यालय हे रोकडे नगर येथील रोकडी हनुमान मंदिर व सप्तशृंगी देवी मंदिराच्या समोर असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान च्या सेवक निवास येथील संकुलातील इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यात येत आहे

शेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी या बाबीची नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले आहे

Leave a Comment