Home Breaking News तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मनात्री खुर्द या गावी 24 वर्षीय...

तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मनात्री खुर्द या गावी 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

477
0

 

अतिशकुमार वानखडे अकोला

केल्याची घटना सकाळी 9 ते 10 च्या सुमारास घडली.या घटनेचे सविस्तार वृत असे की विजय प्रमोद गवरगुरु वय 24 असे युवक मृतकाचे नाव आहे. हा युवक पंचगव्हाण येथील रहिवासी असून तो काही दिवसापासून मनात्री येथे वीटभट्ट्यांवर कुटुंबासहित काम करीत होता. तो रविवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान शौचालय गेला होता .बराच वेळ झाल्याने घरच्यांनी शोधाशोध घेतली असता सदर युवक गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वीटभट्टी मालकांना सदरची घटना पाहून पोलिस स्टेशनला खबर दिली .त्यानुसार तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख साहेब व बीट जमदार रामेश्वर वाकोडे व त्यांचे सहकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. व सदर मृतदेह तेल्हारा येथे शासकीय रुग्णालयात उत्तरनीह तपासणी करीता पाठवण्यात आला .तेल्हारा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक देशमुख साहेब व रामेश्वर वाकोडे हे पुढील तपास करीत आहेत

Previous articleमुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी येथे २ बैल जोडया चोरीला , भुरटया चोरांचा लाखपुरीत धुमाकुळ …
Next articleमिळाले केवळ आश्वासन ! लोकप्रतिनिधी मजे में??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here