Home अकोला दहा वर्षा नंतरचे सर्व मित्र  वर्ग एकत्र —- आज दिनांक 23 नोव्हेंबर...

दहा वर्षा नंतरचे सर्व मित्र  वर्ग एकत्र —- आज दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी जी प विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अडगाव बु

451
0

आठवण हेच साठवण

दिपक रेळे प्रतिनिधी आडगांव बु

  अडगांव बु जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय  शाळा येथील 2009-2010 या शैक्षणिक नवर्षातील विद्यार्थी,विद्यार्थिनी दिवाळीचे ओचित्य साधून एकत्र येऊन नवीन एक उपक्रम केला.या मागे एकत्र येण्याचा उद्देश दोन वर्ग मित्र दिपक रेळे, दिपक घाईट,  शेख साबीर ,त्यावेळेचे वर्ग शिक्षक श्री इंगळे सर याना भेटले व 2009 -2010 चे सर्व मुले मुली एकत्र ग्रुप तयार केला .ग्रुप तयार करून लग्न झालेल्या मुला मुलीशी बोलून ग्रुप तयार करण्याचे कारण सांगितले.यामध्ये नौकरी करणारे मुले मुली समाविष्ट आहेत.ग्रुप तयार करण्याचा उद्देश ,या धक्काधकक्कीच्या जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख येतात. या सुख दुखःत कोणी मदत करत नाही पण आम्ही ऐका वर्गातील मित्र मित्रीणि एकत्र येऊन वर्गातील एखादया मुला मुलीला अडचण आल्यास सर्व मिळून फुलनाही फुलाची पाकळीची मदत करण्याची शपथ घेतली ,की अडचणीत असलेली वर्ग मित्र मैत्रिण सर्व मिळून मदत करावी हे ठरविण्यात आले.या प्रसंगी वर्गातील  विद्यार्थी त्यावेळेचे सर्व जण उपस्थित होते.वैद्यकीय,लग्न,आजारात मदत,दवाखान्यात जेवण पोहचवणे,इतर अडचणीत मदत करण्याचे ठेवण्यात आले.या प्रसंगी या विद्यार्थ्यांना पाचवी पासून शिकवणारे शिक्षक हजर होते. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य आर जी जाधव सर अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक पी आर आढाऊ सर होते.या प्रसंगी शिक्षकाची भाषणे झाली,सर्व विद्यार्थी आपापल्या आठवणी कथन केल्या.या वेळी वातावरण अति भाऊ क झाले होते.दहा वर्षा नंतर आपण एकत्रित येत आहो.एकमेकास सहकार्य करण्याचे हमी देत अहो
यावेळी त्यावेळचे वर्ग शिक्षक श्री इंगळे  सर विद्यार्थ्यांना कसे बोलत कसा मार मिळाला याचे वर्णन केले . ,विद्यार्थी यांनी सुद्धा शाळेच्या आठवणी भावुक होऊन सांगितल्या.आणि ग्रुप मध्ये राहून सर्वांचे सुखदुःख समजेल या प्रसंगी कार्यक्रमच संचलन रोशनी गाडगे व मनीषा धमके यांनी केले तर आभार नागेश तायडे याने मानले.कार्यक्रम  सर्व मित्र मैत्रीणी उपस्थित होते  कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित भोजनाचा स्वाद घेतला व कार्यक्रमाची संपन्न झाला

Previous articleमतदार यादी मध्ये चुकीचे नावे समाविष्ठ करणाऱ्यांवर कारवाई करा
Next articleग्रामसेवकावर कारवाईची मागणी जामोद ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिले निवेदन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here