दहा हजाराची लाच पोलिस कर्मचारी ला पडले महागात

 

येवला : सूर्या मराठी न्युज – या लाच प्रकरणात पोलिसांची यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या शहर पोलीस ठाण्यातील शिपायाने लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या पोलीस शिपायाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अतुल सुधाकर फलके असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाभूळगाव येथे झालेल्या दोन गटांतील वादाच्या घटनेत फलके यांनी तक्रारदार आणि त्याच्या वडिलांवर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागिलती. यासंदर्भात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाने २७ ऑक्टोबरला पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे समोर आले.
त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१८) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

लागोपाठ करण्यात आलेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ

तत्पूर्वी, दुसऱ्या एका चौकशीत फलके दोषी आढळून आले होते. चौकशीत समोर आलेल्या अहवालानुसार जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी फलके यांच्यावर गेल्या आठवड्यात निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, लागोपाठ करण्यात आलेल्या या कारवायांमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या लाच प्रकरणी पोलिसांनी छव्वी वर प्रश्न चिन्ह निर्माण होतांना दिसत आहे

Leave a Comment