यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील दहिगाव येथे एका महीलेची आजारास कंटाळुन विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन, याबाबत पोलीस स्टेशनला अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , आज दिनांक २९ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्यापुर्वी दहिगाव येथील राहणाऱ्या कोकीळाबाई प्रकाश पाटील वय६oवर्ष यांनी आजाराला कंटाळुन नायगाव रोडवरील दहीगाव शिवारातील राजु दगडु पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केली आहे . याबाबतची खबर मयत महीलेचे मेहुणे छन्नु पाटील राहणारे नेरी ता . जामनेर यांनी यावल पोलीसात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहे .