दानापूर येथे संविधान दिन साजरा

दानापूर – गोपाल विरघट

येथिल ग्रामपंचायत भवनात आज संविधान वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सरपंच सौ.सपना धम्मपाल वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर ग्रामपंचायत चे लिपिक अशोक रहाणे यांनी संविधाचे सार्वजनिक वाचन करून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .
यावेळी मा, ग्रामपंचायत उपसरपंच साहेबराव वाकोडे, माजी सरपंच महादेवराव वानखडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश येऊल , वसुदेव खवले, रविंद्र तायडे, भास्कर दांदळे, गणेश खडसान, राम हागे , पांडुरंग मानकर, गोपाल विरघट , बाळकृष्ण श्रीनाथ आदींची उपस्थिती होती.तसेच सिद्धार्थ नगर येथे संविधान उद्धेशिकेचे वाचन करण्यात आले रुपनंदा महिला मंडळ , सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment