योगेश नागोलकार
तालुका प्रतिनिधी पातूर
पातुर:- तालुक्यात येथ असलेल्या दिग्रस खुर्द येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित शिर्ला अंधारे येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाची जयश्री राजाभाऊ अंभोरे या विद्यार्थिनींनी दिग्रस खुर्द येथील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत मार्गदर्शन केले आहे.
२०२१- २२ पासुन सातबारावर पिकांची नोंदणी मोबाईलमध्ये ई-पीक त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन स्वतःच्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करुन आपल्या पिकांची माहिती देणे अपेक्षित आहे. या ॲप मध्ये योग्यरीत्या अचुक माहिती , पिकांच्या फोटोसह कशी भरावयाची , पिकांची अचुक आकडेवारी मूळे उत्पन्नाबदल अंदाज बांधता येतो. याबाबत या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यासाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.खरडे , कार्यक्रम समन्वयक व कृषी विस्तार विषय तज्ञ प्रा.एस.टी.कव्हर, कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.ए. देशमुख , कृषीशास्त्र विषय तज्ञ प्रा.एस.एम.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..