गोंदिया-शैलेश राजनकर
भंडारा,दि.14ः-ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर परंपरेनुसार शेळ्यामेंढ्या च्या आंघोळ करण्याकरिता गावानजीक तलावातील पाण्यात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सख्या तीन भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे घडली .
पुयार तलावातील लक्ष्मीपूजन च्या दिवशी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली .
मृतक मधुकर नीलकंठ मेश्राम 42 . सुधाकर नीलकंठ मेश्राम 39 . व प्रदीप नीलकंठ मेश्राम राहणार . ह्या सख्ख्या भावाचे नाव होते .
घटनेच्या दिवशी 13 वर्षीय बालकाला घेऊन मालकीच्या अंदाजे शंभर शेळ्या मेंढ्या घेऊन आंघोळीसाठी गावाजवळील तलावात नेले होते . यावेळी प्रारंभी मृतक मधुकर हा शेळ्या-मेंढ्यांना आंघोळीसाठी खोल पाण्यात उतरला मात्र शेळ्या-मेंढ्या पाण्याबाहेर पडताना . मृतक मधुकर बुडत असल्याचे पाहून मृतक सुधाकर दुसऱ्या भावाने पाण्यात उडी घेतली . तोदेखील बुडताना दिसले यांचे तिसऱ्या प्रदीपने उडी घेतली . मात्र खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने एकमेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला .
यावेळी तुषार ने सदर माहिती दूरध्वनी वरून कुटुंबीयांना माहिती दिली . यावेळी गावकऱ्यांना माहिती होताच गावकरी घटनास्थळी धाव घेतली. गावातीलच काही दिवस बांधवां च्या मदतीने मृत्यू देह तलावातून बाहेर काढण्यात आले .
सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलीस स्टेशन ला होताच येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक चहांदे . यांच्या सह नाईक पोलीस दुर्योधन वके कार . संदीप रोकडे . बावणे . नखाते . घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले .
दिवाळीच्या शुभ प पर्वावर एक्या गरीब कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्यने संपूर्ण पुयार गावात शोककळा पसरलेली आहे .