धनगर जागर यात्रा खामगाव मध्ये संपन्न, आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती.

 

अर्जुन कराळे शेगाव तालुका प्रतिनिधी

अनेक वर्षापासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा खंडित आहे, याच प्रश्नावर पूर्ण महाराष्ट्रभर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाचा मुद्दा लांबून धरला आहे, त्याच अनुषंगाने आज 14 ऑक्टोबर रोजी खामगाव येथे
संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला होता

या मेळाव्याला संबंधित करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबोधले की आमचा लढा हा आमच्या हक्काच्या आरक्षणाचा आहे त्याबद्दल आम्ही कोणाच्याही आरक्षणाला ठेच पोहोचणार नाही व ज्या समाजातील लोक आरक्षणाची मागणी करतील त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे व अशा समाजाला धनगर समाज व मी त्यांचे हक्क व अधिकार मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती धनगर समाज नेते व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार, माजी आमदार नानाभाऊ कोकरे, रेगुलर आमदार आमदार आकाश भाऊ फुंडकर, आदी मान्यवर व धनगर समाजाचे बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.

Leave a Comment