इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी
मुख्याधिकारी मॅडमचे दुर्लक्ष तर शहरवासी त्रस्त
महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या संत नगरीमध्ये नगरपालिका आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून आठ आठ दहा दिवस कचरा उचलला जात
नसल्याने ठीक ठिकाणी कचरा साचून त्यामुळे दुर्गंधी पसरलेली दिसत आहे या सर्वांचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे
याबाबत शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर्स जयश्री बोरकर बोराडे मॅडम यांना वारंवार लेखी व तोंडी सांगून सुद्धा याबाबत त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही असा आरोप शहरातील नागरिकाकडून करण्यात येत आहे