नवरात्र उत्सवानिमित्त निशानपुरा वार्ड येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

दि. ०८ ऑक्टोंबर
हिंगणघाट :- निशाणपुरा वार्ड लोकमान्य टिळक प्राथ.शाळा येथे मॉ साहेब राज माता जिजाऊ चौक व आई रेणुकामाता नवरात्री उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री उत्सवानिमित्ताने अमित गावंडे मित्र परिवार द्वारा मोफत आरोग्य तपासणी (महिला)व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन उत्स्फुर्तपणे यशस्वीरीत्या पार पडले.
वार्डातील बहुसंख्य महिलांनी आरोग्य तपासणी शिबीरात सहभाग नोंदविला तसेच”रक्तदान हेच जीवनदान”या वाक्याला सार्थ ठरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवकांनी व युवतींनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला.
शिबीराचे उदघाटन मा.श्री.कोठेकरसर (मुख्यध्यापक),डॉ. सौ. बोंडे मॅडम( उपजिल्हा रुग्णालय,हिं.),मा.श्री.नरेंद्रजी थोरात पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आले. तर उपस्थित सर्व नागरीकांचे व शिबीराला यशस्वी करतांना महत्वाचा घटक असलेले सेवाग्राम रुग्णालयातील श्री.प्रविणजी गावंडे व रक्तदान शिबीराची टिम व आरोग्य तपासणी साठी आलेली स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या टिमचे श्री. चेतन काळे आभार मानले.
आयोजन यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ धर्मे,अक्षय निकम, अक्षय भांडवलकर,गोपाल जांभुळे,विक्की राऊत,स्वप्निल सुरकार,अमोल बोभाटेअनिल पावडे,दर्शन वाडेकर,आशिष दांडेकर,अखिल देवघरे,चेतन काळे, तुषार चोपडे, अमोल बोभाटे,गोलू पावडे,प्रशांत गावंडे,शैलेष सुरकार,गोलू वरघणे,रोहित मोरे,मो.शाहिद,गणेश पढाल,योगेश सुरकार,चंदु झाडे, पिंटुभाऊ सुरकार, सौ. सोनाली गावंडे,सौ.वैशाली सुरकार,सौ.मिराबाई निकम,कोरे काकू,उगले काकू,सौ.वैशालीताई भडे व सर्व नवरात्री उत्सव मंडळाचे सदस्यांनी खुप परिश्रम घेतले…

Leave a Comment