नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती चे आरक्षण सोडत

————————
नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीतील आठ गणांसाठी आरक्षण सोडत आज २८/७/२०२२जाहिर करण्यात आले असुन अनुक्रमे लोणी पंचायत समिती गणासाठी अनुसूचित जाती स्त्री करिता राखीव असे आरक्षण निघालेले आहे तसेच धानोरा फसी गणासाठी सर्वसाधारण जनुना सर्वसाधारण फुबगाव सर्वसाधारण स्त्री धानोरा गुरुव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री मंगरुळ चव्हाळा सर्वसाधारण स्त्री वाढोणा रामनाथ अनुसूचित जाती सालोड नागरिकांचा मागास प्रवर्ग अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून या आरक्षण निरिक्षक अधिकारी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी आरक्षण सोडत अधिकारी म्हणून नांदगाव खंडेश्वर चे तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी हे होते व तसेच नायब तहसीलदार राठोड व निवडणूक लिपीक मंगेश गावनेर यांनी सोडतीच्या कार्यक्रमाचा पदभार सांभाळला होता अशी माहिती सुमित ढवळे यांनी दिली यावेळी तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती…

Leave a Comment