नांदुरा पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना केलं जेरबंद 19 दुचाकी जप्त

 

इस्माईल शेखबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांना मिळालेल्या खबरेप्रमाणे अधिनस्त अंमलदारांचे पथक तयार करुन सदर पथकाने वरीष्टांचे सूचनाप्रमाणे दिनांक २८/०७/२०२३ रोजी पो स्टे नांदुरा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना दुचाकी चोरीच्या आरोपाखाली संशयित आरोपी शिवाजी एकनाथ वक्टे, अभिषेक ऊर्फ ज्ञानेश्वर गोविंद बक्टे महादेव सतिश वक्टे सर्व रा. वडळी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली

यावेळी आरोपींच्या ताब्यातूनविविध कंपनी च्या विनाक्रमांक एकुण १९ मोटर सायकल किंमती ४,६५००० रुपयाच्या मिळून आल्याने व आरोपींतानी मोटारसायकल चे मालकी हक्काबाबत कोणतेच कागदपत्र सादर न केल्याने सदर मोटारसायकल ताब्यात घेवुन आरोपींता विरूध्द कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदर मोटर सायकल हया आरोपीतांनी कोठुन आणल्या व त्या कोणत्याही प्रकारचे मालकी हक्काचे कागदपत्र जवळ नसतांना सुध्दा ताब्यात ठेवल्या याबाबत तपास करुन पुढील योग्य तो कायदेशिर कार्यवाही करणे सुरु आहे.

सदर कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्री सुनिलजी कडासने साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोकजी थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गवळी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोनि अनिल बेहेरानी यांचे सुचना व खबरे प्रमाणे सपोनि चंद्रकांत पाटील, पोहेकॉ मिलींद जवंजाळ, पोना पंकज डाबेराव,राहुल ससाने,संदीप डाबेराव, शैलेश बाहादुरकर, पोकों कैलास सुरडकर, विनायक मानकर, रविंद्र सावळे, रविंद्र झगरे यांनी केली आहे.

तरी सर्व नागरीकांना ठाणेदार अनिलजी बेहेरानी यांचे व्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की, आपली मोटारसायकल चोरी गेली असल्यास किंवा गहाळ झाली असल्यास पो स्टे नांदुरा येथे आपले मो सा चे कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर येवुन किंवा संपर्क साधुन मिळुन आलेल्या मो सा पैकों आपली मोसा कोणती आहे याबाबत खात्री करावी. व कायदेशीर बाबींची पुर्तता करून मोटर सायकल घेवून जावे. असे आवाहन पोलीस करण्यात आले आहे

पो.स्टे नांदुरा अपराध क्रमांक 443/2023 कलम 124 महाराष्ट्र पोलीस कायदा मधील जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल वर्णन एक काळया रंगाची लाल पांढरे स्टिकर असलेली विना क्रमांकाची हिरो फॅशन प्रो एक काळया रंगाची विना क्रमांकाची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस एक काळया रंगाची निळया व जाभंळया रंगाचे स्टिकर असलेली विना क्रमांकाची हिरो एच एफ डिलक्स एक काळया रंगाची ब्लु सिल्व्हर स्टिकर असलेली

विना क्रमांकाची स्लेंडर प्लस एक काळया रंगाची बिना क्रमांकाची हिरो स्प्लेंडर एक काळया रंगाची बिना क्रमांकाची स्लेंडर प्लस एक काळया रंगाची बिना क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर एक काळया रंगाची लाल व पांढरे स्टिकर असलेली बिना क्रमांकाची हिरो होंडा शाईन sp एक काळया रंगाची बिना क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो काळया रंगाची लाल स्टिकर असलेली विना क्रमांकाची होंडा ड्रिम युगा एक पांढ-या रंगाची टिव्हीएस कंपनीची अपाचे
क्रमांक एम एच 12 एन जी 3485

Leave a Comment