Home Breaking News नांदुरा येथे महत्वपूर्ण रेल्वे गाड्यांना थांबा व इतर सुविधा मिळण्याबाबत निवेदन

नांदुरा येथे महत्वपूर्ण रेल्वे गाड्यांना थांबा व इतर सुविधा मिळण्याबाबत निवेदन

365
0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल )

नांदुरा हे पश्चिम विदर्भातील एक महत्वाचे शहर असून या शहराला अनेक लहान मोठी गावे व बाजारपेठा जोडल्या गेलेल्या आहेत. या अनुषंगाने नांदुरा शहरात आझाद हिंद एक्सप्रेस व जयपूर हैद्राबाद या महत्वपूर्ण गाड्यांना थांबा मिळावा यासाठी केंद्रीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. राजेंद्रजी फडके यांना आज गुरुवार, दि. २१/०१/२०२१ रोजी निवेदन देण्यात आले.
नांदुरा शहरामध्ये आझाद हिंद एक्सप्रेस व जयपूर हैद्राबाद एक्सप्रेस यांना थांबा मिळावा तसेच नांदुरा रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सोयीसाठी कोच इंडिकेटर डिजिटल डिस्प्ले सेवा लवकरात लवकर पुरविण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
यावेळी नांदुरा अर्बन बँकेचे अध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्य श्री अरुणभाऊ पांडव, नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा तथा रेल्वे सल्लागार समिती सदस्या सौ. सारिका राजेशजी डागा तसेच नांदुरा शहर रेल्वे सल्लागार समिती सदस्य श्री स्वप्नील झांबड व श्री आतिक सर आदी उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा !
Next articleमा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती घरा घरात साजरी करा :- विलासराव देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here