नागपूर नर्सिंग ला ऍडमिशन करून देण्याच्या नावावर दोघांनी केली फसवणूक

0
394

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- 17 नोव्हेंबर
दि. 14 ऑक्टोंबर ला आकांशा सुभाष गायकवाड हिंगणघाट पोलीस स्टेशन तिच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल कलम 420,34 अंतर्गत गुन्हा दाखल .
आरोपी मोना गावंडे रा. प्रज्ञा नगर हिंगणघाट व शुभम दुबे रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट यांच्याशी माझी मैत्रीण प्रणिता काटकर रा. आर्दश नगर हिंगणघाट हिचे मार्फत बी.ए.सी. नर्सिग ला अँडमिशन करणे साठी ओळख झाली. प्रणिता काटकर हिने सुध्दा मोना गावंडे व शुभम दुबे यांच्याशी बी. ए. सी. नर्सिंगला अँडमिशन करणे साठी पैशाचा व्यवहार केलेला आहे. डिसेंबर महिण्या मध्ये मोना गावंडे व शुभम दुबे है दोघेही माझे घरी आले व तीने मेडीकल कॉलेज नागपुर येथे बी.ए.सी नर्सिंग प्रथम वर्गाला ऍडमिशन करणे कामी 1,10,000/- रु डोनेशन म्हणुन व 15000/- रुपये कॉलेज ची वार्षीक फी मागितली तेव्हा मी एवढे पैसे भरणे शक्य नाही, असे म्हटले तेव्हा त्यांनी आताचे 20,000/- रु. द्या म्हटले व मुळ लिव्हींग 12 वी व 10 वी वर्गाची मुळ मार्कलिस्ट व बोर्डसर्टीफिकेट, मुळ कास्ट सर्टीफिकेट, मुळ डोमेशिअल सर्टीफिकेट, असे मागितले तेव्हा मी त्यांना मी कॉलेज ला येवुन कागदपत्रे व पैसे देतो, असे म्हटले तेव्हा त्यांनी मला तु जर कॉलेज ला आली तर तुला जास्त डोनेशन सांगतील. त्यामुळे तु आमच्या कडे पैसे व डाक्युमेंट्स दे. आम्ही तुझी अँडमिशन करुन देवू, असे म्हटल्याने मी त्यांना माझे मुळ कागदपत्रे दिले व माझ्या वडीलानी त्या दोघानाही 20,000/- रु. रोख रक्कम दिली. त्यानंतर दि. 31 मार्च 2022 ला मी, मोना गांवडे हिला फोन करुन अँडमिशन बाबत विचारले असता तिने सांगितले की, तुझी अँडमिशन कल्याण इंन्स्टिट्यूट, राजुरा जिल्हा, चंद्रपुर येथे होते. त्यासाठी तु 35000/- रु दे व ओरिजनल कॉस्ट व्हलीडीटी दे असे म्हटले. तेव्हा मी तीला घरी विचारुन सांगते असे म्हटले. त्यानंतर दिनांक 4 एप्रिल 2022 ला मोना गावंडे हिने मला तिचा फोन पे क्रमांक 7798714027 असा सांगुन त्यावर 35000/- रु पाठवायला सांगितले. तेव्हा तीने मला दिलेल्या फोन पे क्रमांकावर 25000/- रु पाठविले. त्यानंतर तीने मला सांगितेले की, तुझी अँडमिशन कल्याण इंन्स्टिट्यूट, राजुरा जि. चंद्रपुर येथे झालेली आहे, असे सांगितले, तेव्हा मी तिला मला नागपुर मध्ये अँडमिशन करायची आहे मला राजुरा मध्ये अँडमिशन नाही पाहीजे. मला माझे कागदपत्र व पैसे परत कर, असे म्हटले असता तीने मला कल्याण इन्स्टिट्यूट, राजुरा जि. चंद्रपुर येथे तुझे कागदपत्र आहे. तेथुन तु घेवुन जा व तुला दोन ते तीन दिवसा मध्ये पैसे परत करतो. अस म्हटले परंतु तीने आज पर्यंत मला माझे पैसे परत केले नाही, मी नागपुर येथे अंजनी रोड नागपुर येथे लोकेश सर यांनी माझे सर्व मुळ कगदपत्र आणुन दिले. माझी मैत्रीण प्रणिता काटकर रा. आर्दश नगर हिंगणघाट हिने सुध्दा मोना गावंडे व शुभम दिवे यांना दोघानाही बी.ए.सी. नर्सीगला अँडमिशन करणेसाठी 1, 10,000/- रु दिले होते. प्रणिता हिची कल्याण इंन्स्टिट्यूट राजुरा जि. चंद्रपुर येथे अँडमिशन झाली असुन प्रणिता हिने राजुरा येथून अँडमिशन कॅन्सल केली परंतु मोना गावडे व शुभम दुबे यांनी प्रणिताला अद्यापावेतो तिच्या कडुन घेतलेले पैसे परत केले नाही. व पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. मौना गावंडे व शुभम दुबे यांनी बी.ए.सी नर्सिंग मध्ये अँडमिशन करुन देतो असे म्हणुन माझ्या कडून 45000/- रु व माझी मैत्रीण नामै प्रणिता काटकर हिच्या कडुन 1,10,000/- रु घेवुन नागपुर येथे अँडमिशन न करता माझी फसवणुक केली आरोपी विरोधात आज दि.17 नोव्हेंबरला अटक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुक्ला करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here