नारंगी मध्यम प्रकल्पाची शतकाकडे वाटचाल

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी-ऋषी जुंधारे

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी प्रकल्पाच्या २२वर्षाच्या इतिहासात प्रकल्पात तिसऱ्यांदा १००टक्के जलसंचय होण्याकडे वाटचाल सुरू आहे.दि.२२रोजी दुपारपर्यंत प्रकल्पात ९०.०७%इतका पाणीसाठा झाला होता.सतत पाणीटंचाईचे झळा सोसणाऱ्या वैजापूर तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील छोट्या-मोठ्या सर्वच प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
१९९८ मध्ये पूर्ण झालेल्या नारंगी मध्यम प्रकल्पाची ऊंची ५४फूट असून प्रकल्प पूर्णत्व झाल्यानंतर वर्ष २००६मध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता.त्यावेळी धरणाचे पाचही दरवाजे उघडून प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग हा नारंगी नदीत करण्यात आला होता.यानंतर २००९ मधेही धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला होता या नंतर ह्या वर्षी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून प्रकल्प १००टक्के होणार आहे.येणाऱ्या एक-दोन दिवसात प्रकल्पातील पाणीसाठा ९५% पेक्षा अधिक झाल्यानंतर कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडुन नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
नदीकाठच्या गावांना यापूर्वीच प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

Leave a Comment