निंबादेवी धरण प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत,पर्यटकांना धरण परिसरात प्रवेश बंद

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

यावल : तालुक्यातील चुंचाळे जवळील निंबादेवी धरण हे प्रशासना कडुन प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे.या धरणावर रविवारी मोठी गर्दी झाली होती व सद्या पाऊस सुरू असल्याने सतर्कता म्हणुन धरण परिसरात पर्यटकांना प्रवेश बंद करीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी चुंचाळे जवळ निंबादेवी धरण आहे सद्या हे धरण पुर्ण क्षेतेने भरले असुन मोठ्या प्रमाणात सांडव्याव्दारे पाणी वाहत आहे तेव्हा या वाहत्या पाण्यात अंघोळ करीता रविवारी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती त्यातच सातपुड्याच्या वनक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने या धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून सांडव्याद्वारे प्रचंड मोठ्या वेगात पाणी वाहत होत. तेव्हा या धरणावर कुठली दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता म्हणून प्रशासनाच्या वतीने धरण क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर केले आहे या संर्दभातील बैठक सोमवारी येथील तहसिल कार्यालयात घेण्यात आली या बैठकीत तहसीलदार महेश पवार, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, प्रादेशिक वनविभाग पश्चिमचे वनक्षेत्रपाल उपस्थित होते या बैठकीत दक्षता म्हणुन निर्णय घेण्यात आला व यावल पोलिसांच्या वतीने धरण परिसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे

Leave a Comment