निरोड अतिक्रमण धारकांचा नमुना ८अ चा प्रश्नन मार्गी लावणार. पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आश्र्वासन.

 

संग्रामपूर : (ता.प्र.) तालुक्यातील निरोड (बाजार) येथिल बंद पडलेल्या बाजाराची शासकीय जागा अतिक्रमण धारकांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी अनुप देशमुख यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या कडे निवेदनातून केली आहे. निरोड येथिल ५० ते ५५ कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून गावालगत बंद असल्याने बाजाराच्या जागेवर गट नंबर २१७ मधे वास्तव्यास आहेत. ह्या रहीवासी असलेल्या नागरिकांना ग्राम पंचायत मार्फत विजेचा, पाणीपुरवठा, लागणा-या ईतर सुविधा मिळत आहे‌त.परंतु या जागेवर वास्तव्य करून राहणा-या लोकांच्या नावे शासनाने घरकुल मंजूर केले पण यांच्या नावाने गाव नमुना ८अ नसल्यामुळे हे सर्व लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित राहत आहेत. या संदर्भात पाठपुरावा करुण जिल्हा प्रशासन दिरंगाई करत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या नावे गाव नमुना ८अ ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात यावी याकरीता अनुप देशमुख, दिनेश सुरळकार, यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी हा निरोड वासियांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्र्वासन पालकमंत्री डॉ शिंगणे यांच्या कडुन देण्यात आले.

Leave a Comment