Home Breaking News नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाऊन...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाऊन केली पाहणी.

266
0

 

 

 

सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

सोयगाव तालुक्यात गेल्या दोन -तीन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.कोरोनाचे संकट कायम असले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अतिवृष्टीमुळे झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे पूर्ण करा,पंचनामे करीत असतांना एकही नुकसान ग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहता कामा नये असे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

सोयगाव तालुक्यातील कंकराळा, माळेगाव, बहुलखेडा,जरंडी, निंबायती,बनोटी इत्यादी भागात अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत प्रारंभी सोयगाव येथे तहसिल कार्यालयात याबाबत आढावा बैठकित झालेल्या नुकसानीचा आढावा महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार,आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, विधानसभा प्रमुख दिलीप मचे, जि.प.च्या महिला बालकल्याण सभापती मोनाली राठोड, डॉ. अस्मिता पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या धृपताबाई सोनवणे,जि.प. सदस्य गोपी जाधव, शिवसेना शहर प्रमुख संतोष बोडखे,पंचायत समिती सभापती रुस्तुलबी उस्मान खाँ पठाण , उपनगराध्यक्षा मंगलाबाई राऊत, पंचायत समिती सदस्य धरमसिंग चव्हाण, निजाम पठाण, आर.एस.पवार,शिवसेना नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन,संजय मुटकुटे, यांच्यासह उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, कंकराळा सरपंच, चंदाबाई राजपूत, माळेगाव सरपंच दादाराव जाधव, बहुलखेडा सरपंच राजमल पवार, बनोटी वाडी सरपंच नितीन बोरसे, जामटी सरपंच राधेश्याम जाधव आदींसह महसूल ,कृषी व विविध
विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Previous articleसंपूर्ण हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा:-आमदार संतोषराव बांगर
Next articleसुनगाव ग्रामपंचायत प्रशासक व पोलीस प्रशासन यांची धडक कारवाई विना मास्क दंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here