गजानन सोनटक्के जळगाव जा
स्थानिक न प सभागृहात दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी पार पडलेल्या सभेत महाविकास आघाडीचे गटनेता तथा काँगेस कमिटी शहर अध्यक्ष अर्जुन घोलप यांनी रमेश ताडे यांचे नाव सुचविले तर नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी अनुमोदन दिले.
ही बातमी नक्की पहा
https://www.suryamarathinews.com/post/8170
पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार मा शिवाजी मगर साहेब यांनी संख्याबळानुसार रमेश ताडे यांची शिक्षण समिती सभापती म्हणून घोषणा केली.
काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा राहूल भाऊ बोन्द्रे तसेच काँग्रेसच्या पक्षनेत्या मा डॉ सौ स्वातीताई वाकेकर, प्रदेश प्रतिनिधी मा रमेशचंद्र घोलप, जिल्हा उपाध्यक्ष मा प्रकाश पाटील,काँग्रेस नेते मा रामविजय बुरुंगले,महिला काँग्रेस अध्यक्षा मा ज्योतीताई ढोकने,
तालुकाध्यक्ष मा अविनाश उमरकर यांच्या सोबत तसेच आघाडीचे सर्व नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करुन व शिवसेना गटनेते मा गजानन वाघ यांना माहिती देऊन अर्जुन घोलप यांनी उपरोक्त निर्णय घेतला व शिवसेना नगरसेवक रमेश ताडे यांचे नाव सुचविले.
सभेनंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल जल्लोष केला तसेच शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेता गजानन वाघ यांनी आघाडी धर्म पाळल्याबद्दल काँग्रेस गटनेता अर्जुन घोलप तथा काँगेस चे सर्व नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी नगरसेवक श्रीकृष्ण केदार,नितीन ढगे, कलीम खा हुसेन खा,सौ चित्राताई इंगळे, ऍड संदिप मानकर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.