यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील पंचायत समिती यावलच्या सभागृहामध्ये ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांची व सरपंच यांची तालुका पातळीवरील नरेगा विकासात्मक रोजगार सेवकांच्या विविध प्रश्ना संदर्भातील संयुक्त आढावा बैठक पार पडली .
या महत्वपुर्ण बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावेर यावल मतदार संघाचे आ. शिरीष मधुकराव चौधरी हे होते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे ,माजी पंचायत समिती सदस्य शेखर पाटील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सय्यद जावेद अली पंचायत समितीवे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी ,सहाध्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षण अधिकारी नईम ए .शेख, महाराष्ट्र सरपंच परिषदेचे यावल तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे उपाध्यक्ष असंद सय्यद ,महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळू तायडे, राज्य संघटक खुशाल पाटील, ग्रामसेवक संघटना यावल तालुका अध्यक्ष रुबाब तडवी हे उपस्थित होते
बैठकीचे प्रास्ताविक सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी केते तर सुत्रसंचालन ग्रामरोजगार सेवक संघटनेचे कार्याध्यक्ष बाळू तायडे यांनी केले तसेच आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर मनोगतात आमदार शिरीष चौधरी यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 264 योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी, ग्रामसेवक , नरेगा विभाग ग्राम रोजगार सेवक बांधवांनी जलद व पारदर्शकपणे यशस्वी रीतीने राबवून गाव तालुका जिल्हा व राज्याचा विकास साधावा व शेतकरी अल्पभूधारक शेतकरी शेतमजूर व व गावातील मजूर यांच्या वैयक्तिक कामाच्या योजना राबविण्यात याव्या तसेच वैयक्तिक गाव विकासाच्या योजना कशा साध्य करता येतील विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यासाठी तत्परतेने आपापले कार्य सर्वांनी केले तरच आपण खऱ्या अर्थाने विकास साध्य करू शकू यासाठी मी एक सेवक म्हणून आपल्या सोबत आहे व आपल्याला सहकार्य करण्यास तयार आहे यावल रावेर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांना ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी लागणारा अँड्रॉइड मोबाईल मी वैयक्तिकरित्या ग्रामरोजगार सेवकांना आर्थिक मदत करून मिळवून देणार असल्याचे आश्वासन व अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली , गावापासून दोन्ही तालुक्याचा विकास करण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक या सर्वांनी हातभार लावावा असे मनोगत व्यक्त केले या मनोगतात विशेष त्यांनी रोजगार सेवकांच्या समस्या या विषयावर सुद्धा लक्ष केंद्रित केले व ग्रामरोजगार सेवकांना स्थानिक पातळीवर व तालुकास्तरावर येणाऱ्या अडचणी लवकरच सोडून रोजगार सेवकांच्या समस्या बाबत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याची ग्वाही व आश्वासन दिले, याप्रसंगी प्रभाकर अप्पा सोनवणे , शेखर पाटील , गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.