पळशी झाशी येथील वीज पडून मृत्यू झालेल्या वारसांना प्रत्येकी चार लाखाची आर्थिक मदत, तहसीलदार यांच्या हस्ते धनादेश

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे दिनांक 23 जून रोजी शिवारात वीज पडल्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसास शासनाकडून प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत म्हणून तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हस्ते 24 तासाच्या आत आज दिनांक 24 जून रोजी मृतकाचे कुटुंबाच्या घरी जाऊन धनादेश देण्यात आला.

संग्रामपूर तालुक्यातील पळशी शिवारात विहिरीचे खोदकाम करीत असताना अचानक सुरू झालेल्या पावसामुळे खोदकाम करणारे चार मजूर निंबाच्या झाडाखाली आश्रयास गेले असता त्याच झाडावर वीज पडल्याने त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले संजय उत्तम मारोडे व रवी संजय भालतीडक दोन्ही रा. पळशी झाशी ह्या मजुरांचा मृत्यू झाल्याने मृतकाच्या घरी जाऊन नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदान अंतर्गत दोन्ही मृतकांचे वारसांना त्यांची पत्नी १) मंदा संजय मारोडे, २)शितल रवि भालतडक यांना त्यांचे घरी जावून प्रत्येकी चार लाख रुपयांचा दोन्ही कुटुंबांना शासकीय आर्थिक सहाय्य सानुग्रह अनुदानाचा धनादेश २४ तासाच्या आत तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या हस्ते देण्यात आला., यावेळी सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरिक आणि मृतकांचे कुटुंब उपस्थित होते.

Leave a Comment