Home Breaking News पळसाच्या झाडाला एका 32 वर्षीय महीलेने आज दुपारी 2.वा.दरम्यान गळफास लावून आत्महत्या

पळसाच्या झाडाला एका 32 वर्षीय महीलेने आज दुपारी 2.वा.दरम्यान गळफास लावून आत्महत्या

1623
0

 

धाड ते बुलढाणा दरम्यान मर्दडी देवीचे डोगंरातील भिल्लदरी या परिसरात असणाऱ्या तलावाच्या नजिक एका पळसाच्या झाडाला एका 32 वर्षीय महीलेने आज दुपारी 2.वा.दरम्यान गळफास लावून आत्महत्या

केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एका तरुण महीलेने भरदिवसा गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आणि घटनास्थळी असंख्य नागरीकांनी धाव घेतली..
प्राप्त माहिती अशी की आज दुपारी ढालसांवगी शिवारातील भिल्लदरी या डोंगराळ परीसरात तलावाच्या वरच्या बाजूला एका पळसाच्या झाडाला एका तरुण महीलेचे गळफास घेतलेले प्रेत आढळून आल्याची माहिती गावात पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
यासंदर्भात कोतवाल विनोद खंडारे यांनी धाड पोलिसांना माहिती दिली
यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर महिला ही साधारण 32 वर्ष वयाची आहे, आणि घटनास्थळी तीची एक बँग आढळून आली त्यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स आणि एक चिठ्ठी आढळून आली पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे यामध्ये आपण स्वखुशीने आत्महत्या करत असुन याबाबत कोणासही जबाबदार धरणात येऊ नये असा मजकूर त्यात लीहला असल्याचे पोलिसांनी सांगितले….
सदर महिला ही बुलडाणा मधील सुंदरखेड येथील रहिवासी असुन,स्मिता प्रल्हाद चोपडे असे तीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे, ही महीला आज दुपारी धाड बुलढाणा रोडवर दुपारच्या वेळी फीरतांना ग्रामस्थांनी पाहल्याची चर्चा आहे.
याठिकाणी पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला असून या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे सह ए.पि.आय.निलेश अपसुंदे, पि.एस.आय.गजानन मुंडे, आणि कर्मचारी करत आहेत.

Previous articleजातेगांव येथे क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी
Next articleसंग्रामपूर तालुक्यात  किडनीच्या  आजाराने  आणखी एक बळी ….. 1 महिन्याच्या आत सहावे मृत्यु;मृत्यूचे तांडव सुरुच …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here