पत्रकार दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांना लवकरच वाच्या फोडणार आमदार नितीन देशमुख.
प्रतिनिधी अशोक भाकरे
मोरगाव भाकरे
पातुर येथे ६ जानेवारी रोजी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नवनिर्वाचित शिवसेना शहर प्रमुख निरंजन बंड यांनी.ठाकरे गटाचे आमदार नितीन बापू देशमुख यांच्या हस्ते 6 जानेवारी रोजी पत्रकारांचा पुष्पगुच्छ व ऑफिस बॅग गिफ्ट देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
पातूर शहराला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नव्याने शिवसेना पातुर शहर प्रमुख पदी निरंजन बंड यांची नियुक्ती केली असून या नियुक्ती निमित्त व पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सोबत शेतकऱ्यांच्या समस्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा, शेतकऱ्यांना शेती विषयक विद्युत पुरवठा सतत ठेवण्याकरिता, ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी पुरवठा सलग्नित, विकासात्मक धोरण ठेवून निधी विषयक बैठक घेण्यात आली.
पत्रकार दिन 6 जानेवारी रोजी आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार दिनाचा दिवस निवडून शेतकऱ्यांना लवकरच शेतीतील वीज पुरवठा विषयी असलेल्या समस्यांना शासनाच्या पाटलावर मांडून जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडवणीस यांच्या समोर खंबीरपणे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची बाजू मांडणार अशी माहिती पातुर बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली.
पत्रकार दिनानिमित्त पातुर शहरातील व तालुक्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले नव्याने पदग्रहण स्वीकारणारे पातूर शहर शिवसेनाप्रमुख निरंजन बंड यांनी पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांना दैनंदिन काम करत असताना लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू हॅन्डबॅग देऊन पत्रकार यांना गौरविण्यात आले.
यावेळी आमदार नितीन देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, पातूर तालुका शिवसेना अध्यक्ष रवी मूरतंडकर, माजी नगरसेवक परसराम उंबरकार, सुनील गाडगे,नव्याने रुजू झालेले पातूर शहर पक्षप्रमुख निरंजन बंड, माजी नगरसेवक सुरेंद्र उगले, युवा तालुका प्रमुख सागर रामेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल निमकंडे, शंकरराव देशमुख, दिलीप फुलारी, बंडू देवकर, कैलास बगाडे, दिलीप देवकर, आनंद तायडे, सचिन गिरे ,अंबादास देवकर , विशाल गोतरकार, किशोर फुलारी, स्वप्निल परमाळे, रवी काकड, संतोष गवई, सतीश देशमुख, राजू राठोड यांच्या सह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते याच्या उपस्थितीत पत्रकार दिनानिमित्त पातुर शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमामधे नव्याने बोडखा ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच विकास सुभाष वानखडे,तर रविंद्र बबन डाखोरे उपसरपंच, नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्य यांचा आमदार नितीनबाप्पु देशमुख व पातूर शहर प्रमुख निरंजन बंड यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे जेष्ठ पत्रकार सूत्रसंचालन प्रदीप काळपांडे यांनी केले तर पत्रकार दिनानिमित्त उमेश जेष्ठ पत्रकार उमेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार दिन या कार्यक्रमाला पातुर शहरातील व ग्रामीण चे पत्रकार व शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कुदुस शेख यांनी केले.