Home Breaking News पारंपारिक पद्धतीने अर्ज दाखल करत उमेदवारांत समाधानाचे वातावरण

पारंपारिक पद्धतीने अर्ज दाखल करत उमेदवारांत समाधानाचे वातावरण

801
0

 

सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)

नांदगांव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबर पासून इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली परंतु आॅनलाईन अर्ज दाखल करताना उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन आयोगाने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि. ३० डिसेंबर रोजी आॅफलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना संधी दिली. यामुळे काही उमेदवारांनी आॅनलाईन तर काही उमेदवारांंनी आॅफलाइन अर्ज दाखल करुन संधीचे सोने करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तहसील आवारात बहुसंख्य उमेदवार आपला अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. नांदगांव तहसील इमारतीत निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया सूत्रबद्धपणे पार पाडली. यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाने विशेष भूमिका बजावली.

Previous articleअनुसूचित जाती, ओ बी सी प्रवर्ग,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण (ओपन) यांसाठी चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका
Next articleअमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here