बुलढाणा :- पंकज थिगळे
मेहकर तालुक्यामधील पार्रडी येथील शेतकरी शेतामध्ये गुरे चारत असताना ,रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने, जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
पारडी येथील हिरालाल दासू राठोड वय 55 वर्ष हा शेतकरी त्यांच्या हिवरा खुर्द शिवारातील स्वतःच्या शेतामधील धुऱ्यावर गुरे चालत असताना, शेतामधून रानडुकरांचा कळप धावत आल्याने गुरे सैरावैरा पळाली, परंतु उभ्या असलेल्या शेतकऱ्यावर दोन डुकराने हल्ला चढवून, डोक्यावर कपाळावर उजव्या डोळ्यावर नाकामधील मध्यभागी पाठीवर नखाने हल्ला करून जखमी केले, त्यांना उपचारासाठी जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता ,.वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे त्यांना पाठविण्यात आले. मौजे पारडी येथील पोलीस पाटील अमोल शिलार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता
वनरक्षक के बी धनगर यांनी शेतकऱ्यावरील रानडुकराच्या हल्ल्याची माहिती करतात जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर शेतकऱ्याची असणे चौकशी करून पंचनामा केला त्याचे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाण्याला पाठवण्यासाठी सहकार्य केले. सदर अहवाल वनविभाग यांना पाठवून वन विभाग या शेतकऱ्याला तात्काळ मदत करतील अशी अपेक्षा जनता करीत आहे.
एम.सी.एन. न्यूज साठी
प्रमोद मिश्रा मेहकर