पित्याने केली मुलाची हत्या -गुन्हा दाखल

 

गजानन सोनटक्के  जलगाव जामोद :- प्रतिनिधी

तालुक्यातील ग्राम भिंगारा येथे घरगुती वादातून पित्याने केली मुलाची हत्या जळगाव ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
तालुक्यातील ग्राम भिंगारा येथील रहिवाशी रायजाबाई हिरालाल चव्हाण वय २७ वर्ष या महिलेने जळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की दिनांक २२ नोव्हेंबर रोजी ११ वाजेच्या सुमारास तिचा पती हिरालाल मैकालसिंग चव्हाण वय ३०वर्ष व ससुर मैकालसिंग तानसिंग चव्हाण वय ५७ वर्ष राहणार भिंगारा यांच्यामध्ये शाब्दिक वाद होत होता तिचा सूर मृतक हिरालाल ला म्हणत होता की तू इथे माझ्या सोबत राहू नको आणि माझ्या समोर येऊ नको याच्यावर मृतक म्हणाला की तू माझा बाप आहे मी तुला सोडून कुठे जाऊ नाहीतर मला सांग की माझा बाप कोण आहे या कारणावरून आरोपी मैकालसिंग चव्हाण यांनी रस्त्यावरच दगड उचलून हिरालाल च्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले गंभीर अवस्थेत त्याला आम्ही जळगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोला येथील विदर्भ हॉस्पिटल मध्ये भरती केले त्या ठिकाणी 23 नोव्हेंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशा तक्रारीवरून आरोपी मैकालसींग याच्याविरुद्ध कलम 304 नुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रमेश धामोडे व पीएसआय प्रल्हाद मदन व त्यांचे सहकारी संजय राऊत आणि गणेश पाटील हे करीत आहे पोलिसांनीआरोपीला अटक करून ताब्यात घेतला आहे

Leave a Comment