मुंबई पुण्यात पत्रकारांचा मृतु कोविड सेंटरच उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्रीयांचा राजीनामा द्या पुण्यातील टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये पांडुरंग यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावल्याने जम्बो हॉस्पिटलमधून खासगी हॉस्पिटलला शिफ्ट करण्यासाठी त्यांना कार्डिअक रुग्णवाहिकेची गरज होती. पण रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही.
कार्डिअक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचेपर्यंत पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पुण्यामध्ये TV9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला? हे सत्य आहे कारण या महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे पांडुरंग यांचा जीव गेला, असं म्हणत नितेश राणे यांनी सरकारवर टीका केलीये.
दरम्यान, कोरोना काळात नि:स्वार्थी भावनेने सेवा देणारे पत्रकारही सुरक्षित नाहीत. जम्बो कोविड सेंटरचे उद्धाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.