पूरग्रस्तांना एक हात मदतीचा….सीदी रेल्वे येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्त घरांची प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केली पाहणी……

 

शेकडो पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतूल वांदिले’ यांच्या सामाजिक उपक्रम…….!

हिंगणघाट :- सिंदी रेल्वे येथे अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागात पाहणी करुन गरजू कुटूंबाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली मदत.
सिंदी रेल्वे येथे निसर्गाच्या प्रकोपाने अनेक प्रभागात अतिवृष्टी झाली असून अनेक घरामध्ये पाणी शिरले.

अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतमजूर, कामगार हतबल झाला असून सातत्याने निसर्गाचा प्रकोप वाढत असल्याने त्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. शहरात व ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेकांचा घरा मध्ये पाणी शिरले होते. त्यांची पाहणी करून गरजू कुटूंबाना मदत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली

सिंदी रेल्वे भागातील अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचा घरामध्ये प्रमाणात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत च्या पावसाने क्षतीग्रस्त झाल्याच्या घटना देखील झाल्या आहे. सोबतच पाळीव जनावराची सुद्धा जीवितहानी झालेली आहे. शेतकरी व नागरिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी एक हात मदतीचा म्हणून पूरग्रस्त कुटूंबाची पाहणी करून त्यांना मदत केली.

पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेकडो पूरग्रस्तांना धान्य किट वाटप करताना माजी नगराध्यक्ष तथा माजी सभापती कृ.उ.बा.स.बबनरावजी हिंगनेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी उपाध्यक्ष न.प.सुधाकरराव खेडकर, प्राचार्य तथा माजी उपाध्यक्ष अशोकजी कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अशोकबाबू कलोडे, अमोल बोरकर, वसंताजी सिर्से, गजाननराव डबारे, प्रकाश सोनटक्के, युवा शहर अध्यक्ष तुषार हिंगणेकर,माजी नगरसेवक सुमनबाई पाटील,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बबलू खान,अशोकबाबू कलोडे, गुड्डू कुरेशी, गजानन खंडाळे, सुनील शेंडे, अशोक सातपुते, रवी राणा, युगल अवचट, मनोहर चंदनखडे, सुनील भुते, पप्पू आष्टीकर, पुरुषोत्तम कांबळे, गजू महाकाळकर, अमोल मुडे, सुशील घोडे यांच्यासह सिंदी रेल्वे भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Comment