Home Breaking News पेन टाकळी धरणावरील कॅनॉल फुटला । अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुसकान !

पेन टाकळी धरणावरील कॅनॉल फुटला । अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुसकान !

354
0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मेहकर तालुक्यातीलअतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या
पेनटाकळीचा कॅनाॅल फुटला.शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान पाटबंधारे
पेनटाकळी प्रकल्प झाल्यानंतर पेनटाकळी कॅनाॅलचे काम 1996 च्या दशकात पूर्ण झाले. हा कॅनोल झाल्यापासून तो सतत वादग्रस्त ठरत आला आहे.पेनटाकळी धरणाचा हा कॅनाॅल पेनटाकळी, दुधा, रायपूर ,सावञा,जानेफळ, गोमेधर येथील शेतकरी बांधवांच्या शेतातून जातो.सदर कॅनाॅलला 14डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात आले होते.तो फुटल्यामुळे दुधा येथील गजानन अवचार परसराम अवचार या शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे.तर रायपूर येथील शेतकरी मनोहर काळे यांच्या शेतातील कॅनाॅलच्या भिंतीला तडे गेले असून त्यातून मोठाले नळ लागावेत असे पाणी पाझरताना दिसत आहे.1ते 11किमी चे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झालेले असून या जमीनी सतत पाझरत असल्यामूळे शेतकरी बांधवांचे सतत नुकसान होत असते.कॅनाॅलच्या भिंतीवर मोठ मोठाली झाडे वाढली आहेत.साफसफाई न करताच पाणी सोडल्यामुळे कॅनाॅलच्या भिंतीतून पाणीपाझरत आहे.अनेक वेळा यासाठी आंदोलने ,उपोषण करण्यात आलेली असून 1ते 11 कीमी पर्यंत पाईपलाईन व्दारे पाणी नेवून नुकसान भरपाई ची मागणी परीसरातून जोर धरत आहे.
पावसामुळे व नदीच्या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. व आता कॅनाॅल तुटल्यामुळे जमीन खरडून गेली याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे :या घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सोळंके यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला व लवकरच कॅनॉल चे काम दुरुस्त करू असे सांगितले !

Previous articleसमुदाय आरोग्य अधिकारी पदावर गुंज येथे डॉक्टर जयश्री शेळके रुजू !
Next articleसिंदखेड राजा तालुक्यात समुदाय आरोग्य अधिकारी पदावर 15 डॉक्टरची नियुक्ती ! अधिकारी कामावर रुजू ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here