सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट :- 29 ऑक्टोंबर
शहरात महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा घटना वाढत आहेत शहरातील युवती मध्ये दहशतीचौ वातावरण आहे,अशा घटना लक्षात घेत समाजसेवक सनी बासनवार यांची शहरात चार्ली पथक सुरू कराण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली.
शहरात टवाळखोरी च प्रमाण वाढत चाललं आहे.बसस्टाॅप,नंदोरी चौक,बिडकर कॉलेज,झांसी यांनी चौक या परीसरात जास्त या घटना घडत आहे तसचं हिंगणघाट शहरात गेल्या तीन वर्षांत अनेक प्रकरणं झाले आहे यात अंकिता जळीतकांड व अन्य प्रकरण घडले आहे, या घटनांना लक्षात घेता शहरात चार्ली पथकाची गरज आहे यावर चर्चा करण्यांत आली यावर निर्णय घेत शहरात चार्ली पथक सुरू करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सहमंत्री सनी बासनवार यांनी केली .