फायनान्स कंपनीच्या कंटाळुन कोरपावलीतील शेतकऱ्याच्या तरुण मुलाने केली विष घेऊन आत्महत्या

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील कोरपावली येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याच्या तरुण मुलाने स्वतः व वडील कर्जबाजारी असल्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार दिनांक १२ जुन रोजी झाला, या तरूणाचा रुग्णालयात उपचार असताना तो दिनांक १६ जुनच्या रात्री मयत झाला, तरूण शेतकऱ्याच्या अशा दुदैवी मृत्यु मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरपावली येथील संजय ऊर्फ बाळू रमेश महाले वय ३८ याचे वरती एका खाजगी फायनान्स कंपनीचे कर्ज होते . तसेच त्याचे वडिलांवर देखील बँकांचे कर्ज आहे या कर्जाचा डोंगर पेलवला जाणार कसा यामुळे त्याने त्याचे राहते घरात दिनांक १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान आई वडील व कुटुंब जेवण करीत असताना निवांत त्यांना समजू न देता विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आल्याने तात्काळ त्यास तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तो १६जुन चे रात्री मयत झाला याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयताचे पश्चात आई वडील पत्नी मुलगी मुलगा भाऊ असा परिवार आहे फायनान्स कंपनी सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असताना शेतकऱ्यांना कर्जफेड करता येत नसल्याने फायनान्स कंपन्या या शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांचा आर्थिक व मानसिक छ्ड करीत असुन , अशा प्रकारे फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या करण्याची यावल तालुक्यातील ही तिसरीफार घटना आहे . शासना तात्काळ अशा प्रकारे नागरीकांचा मानसिक व आर्थिक छड करणाऱ्या बेलगाम झालेल्या फायनान्स कंपन्यांवर तत्वरीत कार्यवाही करावी अन्यथा अशा छ्डाला त्रस्त होवुन अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहिलेला नाही तरी अशा या फायनान्स कंपन्यांवर कारवाई व्हावी अशा अनेकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत .

Leave a Comment