बारावीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शहरातील वैभव सिंघवीचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केले अभिनंदन

 

हिंगणघाट नईम मलक

बारावीच्या परीक्षेत हिंगणघाटचे वैभव कायम राखले शहरातील वैभव सिंघवीचे घरी आज शुक्रवारी १० जुन ला जाऊन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी केले अभिनंदन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला बारावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक ०८ जुन २०२२ ला ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. त्यामध्ये हिंगणघाटच्या जी.बी.एम.एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव मनोज सिंघवी याने ९७.३३ गुण प्राप्त करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या बद्दल माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील शिक्षणाचा संदर्भात आव-विचार घेत भावी शैक्षणिक वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. वैभव सिंघवी याने जिल्ह्यातून प्रथम येत हिंगणघाटचे वैभव कायम ठेवत हिंगणघाटची मान आणखी उंचावले असे मत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी व्यक्त केले. तसेच आई-वडील व आजी यांनासुद्धा मुलाच्या यशाबद्दल अभिनंदन केले त्यावेळी नगरसेवक सौरभ तिमांडे,गौरव तिमांडे, अमोल त्रिपाठी,युवराज माऊस्कर,आदर्श त्रिवेदी,अक्षय भगत,रेहान सय्यद आदी उपस्थित होते.

Leave a Comment