बाळापुर रोडवरील आनंद सागर विहार जवळ निर्दयतेने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे वाहन जप्त .दोघाविरुद्ध गुन्हा दाखल


 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाळापुर रोडवरील आनंद सागर विहार जवळ निर्दयपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे वाहन शहर पोलिसांनी नाकाबंदी करून जप्त केले याप्रकरणी दोघा आरोपी विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार

आज दिनांक 01/07/2023 रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांना खात्रीशीर व गोपनीय माहिती मिळाली की, एक टाटा कंपनीच्या निळ्या रंगाच्या वाहनांमध्ये 4 गोवंशांना वाहनात टाकून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना जबरदस्तीने अडचणीत दोराने बांधून कोंडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून बाळापुर रोड ने घेऊन जात आहे.

अशा माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील सोबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाघमारे पोलीस नाईक गणेश वाकेकर पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे यांनी आनंद सागर विहार परिसरामध्ये नाकाबंदी करून मिळालेल्या माहितीप्रमाणे निळसर रंगाचे वाहन क्र. MH-28-BB- 5278 ला अडवले.

त्यांनी वाहनातील जनावरांचे पाहणी केली असता त्या मध्ये लाल रंगाचे दोन बैल, एक काळया भुरकट रंगाचा बैल, तसेच एक पांढरे रंगाचा बैल असे एकुण 4 गोवंशीय जनावरे बळजबरीने वाहनात कोंबून दोराने बांधून निर्दयतेने वाहून नेतांना मिळून आले. जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास त्याचे नाव व गावाबाबत विचारणा केली असता त्याने त्याचे नाव अमीर खान बुढण खान वय 24 वर्षे रा. इदगहा प्लाट शेगाव असे सांगीतले.

त्यास वाहनातील जनावरे बाबत अधिक विचारना केली असता त्याने वाहनातील नमूद चार गोवंशे ही ( आरोपी क्र.2) मोहमंद शकील मोहमंद शफी वय 42 वर्षे रा. बाळापुर याचे सांगणे वरून कृषी उत्पन्न बाजार समिती वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथुन खरेदी केले व बाळापूरला घेऊन जात असल्याचे सांगितले.

वरून दोन्ही आरोपीतांचे कृत्य हे कलम कलम 11(1) (घ) (ड) (च) प्राणी निदर्यतेने वागविने अन्वये गुन्हा होत असल्याने प्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी राहुल काटकाडे हे करीत आहे.

Leave a Comment