प्रतिनिधी अशोक भाकरे
निंबा फाटा येथे व्यापारी फिर्यादी प्रशांत गुलाबराव ठाकरे रा. मालवाडा यांनी दिनांक 22 11 2022 रोजी पोस्टला येऊन तक्रार दिली की त्यांचे निंबा फाटा येथील कृषी केंद्र दुकान अज्ञात चोरट्यांनी रात्री दरम्यान शटर वाकून दुकानातील नगदी 10,000/- रुपये चोरून नेले व तसेच माझे दुकान समोरील व्यापारी देवानंद अशोकराव पाथरिकर राहणार निंबा फाटा यांचे दुकानातील शटर वाकून वरील अज्ञात चोरट्यांनी नगदी 8000/- रुपये अशी दोन्ही दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 461,380 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांचे मार्गदर्शन तपास पथक तयार करून तात्काळ निंबा फाटा व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून व तांत्रिक साधनाचा वापर करून सदर आरोपींना काही दिवसातच छडा लावून संशयित आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेतले आरोपी 1) धनंजय उर्फ चींना रामकृष्ण अप्पा रेड्डी वय 46 राहणार मगाल क्वाटर विकलांग क्वाटर इंदापूर रोड कादरी जिल्हा पटूपर्थी राज्य आंध्र प्रदेश,2) फरहान अहमद अब्दुल गफार वय 27 रा. इंदिरानगर कापूसतळणी तालुका अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती ह.मू. हैदराबाद यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यामध्ये अजून एक साथीदार शेख अन्सार शेख कयूम रा. अमरावती हा असल्याचे सांगितले आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून मुद्देमाल जप्त करून आरोपी पोलीस स्टेशन उरळ पोलीस कस्टडी मध्ये असून पुढील तपास कार्यवाही सुरू आहे. कार्यवाही करणारे तपास पथक, ठाणेदार अनंतराव वडतकर, पोलीस अंमलदार संतोष भोजने, अनिल येनेवार, रवी हिंगणे, हरिहर इंगळे, शैलेश घुगे, कांताराम तांबडे यांनी कार्यवाही केली.