अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांची ना.गडकरी यांच्या कड़े मागणी
बुलडाणा जिल्हा व शहराच्या विकासात भर टाकणाऱ्या ज्ञानगंगा अभ्यारण्य बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा शहरासाठीचा बायपास या मागण्यासाठी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या बाबत शासन दरबारी वरिष्ठ पातळीवर बैठका सुद्धा पार पडल्या आहेत.ना.गडकरी साहेब यानी बुलडान्यासाठीच्या बायपास ला तात्विक मान्यता दिल्या नंतर अंदाज पत्रकही तयार करण्यात आलेले आहे. पुढील केंद्र पातळी वरील मान्यतेसाठी व निधि उपलब्ध करून देण्यासाठी आज दि.08/11/2020 रोजी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितिनजी गडकरी यांची नागपुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन बोथा घाटातील उड्डाणपुल व बुलडाणा शहरासाठीचा बायपास याबाबत सविस्तर माहिती दिली व राज्यशासनाकड़े प्रस्ताव प्रलंबित असल्याचे ना.गडकरींच्या लक्षात आणून दिले.
ना.गड़करी यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद आहे की,
“आपण भारतीय जैन संघटनेच्या बुलडाणा जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी आलेले असताना मी दि 3 मार्च 2018 रोजी बुलडाणा शहरातील बायबास किंवा उड्डाणपूल तसेच ज्ञानगंगा अभयारण्य बोथा घाटातील उड्डाणपूल पूलासाठी मान्यता देऊन काम सुरू करणेबाबत आपणास आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिले होते .
सदर पत्रातील विनंती नुसार तत्कालीन मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मा प्रवीण परदेशी यांनी त्यांच्या दालनात दि 22 मे 2018 रोजी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मीटिंग घेतली होती .
सदर मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे बुलडाणा शहरासाठीच्या बायपास आणि ज्ञानगंगा अभयारण्य यामधून जाणाऱ्या रस्त्यावर तारेचे कुंपण किंवा उड्डाणपूल बनविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे ठरले होते . तसेच अभयारण्य यातील उड्डाणपूल की तारेचे कुंपन यासाठी मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीने सुचविल्या प्रमाणे कार्यवाही कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांच्यामार्फत प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याचे ही ठरले होते .
त्यानुसार दि 17/7/2018 रोजी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली बुलडाणा येथे समितीची मीटिंग होऊन अभयारण्यांतून उड्डाण पूलाचे बांधकाम सर्व दृष्टीने सोईचे आणि फायद्याचे ठरेल असे सर्वानुमते ठरले होते .
उड्डाण पूल बनवल्यास वन्यजीवांचे अपघात होणार नाही ,वन्यजीवांचा मुक्त संचार होईल, वन संपदेची सुरक्षितता वाढेल .
उड्डाणपूलावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकाचे वन पर्यटन होईल .वाहतुकीसाठी रस्ता बंद करावा लागणार नाही .
उड्डाणपुलासाठी कोणतेही झाडे तुटणार नाही कारण अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच उड्डाणपुलाचे होणार आहे, उड्डाणपुल करताना वळणे कमी झाल्याने अंतर कमी होईल . पर्यायाने इंधनाची फार मोठी बचत होईल , वळणे कमी झाल्याने आणि उड्डाणपुलाचे काम सरळ होणार असल्याने आता असलेल्या वळणावरची जमीन वनविभागाला परत मिळेल, वनविभागाची जमीन केवळ उड्डाणपुलाचे पिलर साठीच लागणार असल्याने जमीनही वाचेल .
वरील मुद्दे विचारात घेता वन विभाग किंवा अभयारण्य यातून जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल बनविणे सर्व दृष्टीने फायदेशीर ठरत असल्याने उड्डाणपुलच बनवावा असे ठरलेले आहे . तसेच हा पॅटर्न देशभरात वन विभागाच्या हद्दीत लागू केल्यास वन संपदेचे, पर्यावरण होणारे नुकसान टळेल तसेच वळणे कमी झाल्याने अंतर कमी होऊन इंधनाची बचतही होऊन राष्ट्रीय कार्यास हातभारही असेही समितीचे मत झालेले होते.
समितीच्या बैठकीनंतर कार्यकारी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग यांनी ज्ञानगंगा अभयारण्य यातून जाणाऱ्या पुलाचे अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे ठरल्यानुसार कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला यांनी सदर उड्डाणपूलाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या मार्फत राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती कार्यकारी अभियंता , राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून मिळालेली आहे.
सोबतच मलकापूर सोलापूर NH 753 A, अजिंठा _ बुलडाणा_ बैतुल 753 E , बुलडाणा _ धाड राज्यमार्ग 226 हे मार्ग बुलडाणा शहरातून जातात . त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवित हानी होत आहे.अजिंठा बुलडाणा खामगाव शेगाव बैतुल या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे आणि ज्ञानगंगा अभयारण्य बोथा घाट तसेच बुलडाणा सुद्धा याच रस्त्यावर आहे.
अशी सर्व काही परिपूर्ण माहिती ना.गड़करींना देऊन राज्य शासनास सादर केलेल्या बोथा घाटातील उड्डाणपूलाचे व बुलडाणा
शहरासाठीचा बायपास रस्त्याचे अंदाजपत्रक केंद्रा कड़े बोलावून दोन्ही विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा व काम तत्त्काळ सुरू करावे.
अशी आग्रही मागणी मा.आमदार विजयराज शिंदे यांनी ना.गड़करीं कड़े केली आहे.