विठ्ठल अवताडे बुलढाणा
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेडची पदाधिकारी बैठक संपन्न झाली.ही बैठक रेकाॕर्ड ब्रेक व ऐतिहासिक झाली.सतत ५ तास ही बैठक चालली.या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
शिवसेना-ब्रिगेड युती झाल्यानंतर पुढील वाटचालीचे सखोल व गांभीर्याने नियोजन करण्यात आले.१७ सप्टेंबरला प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात भव्य प्रमाणात साजरा करण्याचे ठरले.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अॕड मनोजदादा आखरे,महासचिव सौरभदादा खेडेकर,मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे सर,कोषाध्यक्ष संतोष गाजरे,कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,डाॕ.गजानन पारधी,डाॕ.शिवानंद भानुसे,डाॕ.बालाजी जाधव,डाॕ.सुदर्शन तारख,डाॕ दिलीप चौधरी,डाॕ.कडलग,डाॕ.तुपेरे,उमाकांत उफाडे,चंद्रकांत वैद्य,सुहास राणे,अभिमन्यू पवार,अभिजीत दळवी,गजानन भोयर,संतोष शिंदे यासह सर्व केंद्रिय कार्यकारिणी सदस्य,सर्व विभागीय अध्यक्ष,सर्व जिल्हाध्यक्ष,सर्व तालुकाध्यक्ष,महानगर अध्यक्ष उपस्थित होते.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन इंजि.तुषार उमाळे यांनी केले.