Home Breaking News भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. भाजपची ज्ञानेश...

भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा. भाजपची ज्ञानेश वाकुडकर विरोधात पोलिसात तक्रार.

329
0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर यांचेवर तातडीने गुन्हे दाखल करा अश्या मागणी ची तक्रार आज दिनांक 17 जानेवारी रोजी माजी मंत्री तथा आमदार डॉ संजय कुटे यांचे मार्गदर्शनात भाजपच्या वतीने जळगांव जामोद पोलिसांना दिली. देशाचे माजी पंतप्रधान , भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी , समाजासाठी दिले. अश्या आदर्श पुरुषांबद्दल तथाकथित स्वयंघोषित समाजसेवक व लेखक ज्ञानेश वाकुडकर रा नागपूर याने त्यांच्या चरित्राबद्दल अतिशय घृणास्पद लिखाण केले. त्यांची तुलना मंत्री धनंजय मुंडे यांचेसह केली. विदर्भ मतदार या वृत्तपत्रात त्यांचा याबाबत लेख प्रकाशित झाला. यावर न थांबता वाकुडकर याने सदर लिखाण व्हाट्सएप व विविध सोशल मीडियावर पसरविले. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात असे लिखाण म्हणजे देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराचा अपमान आहे. आम्ही सर्व त्यांची प्रेरणा घेऊन काम करत आहोत, ते आमच्यासाठी देवाप्रमाणे आदर्श आहेत , त्यांच्या विरोधात अश्या प्रकारच्या अपमानास्पद लिखाणामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. अश्या विकृत मानसिकता असलेल्या ज्ञानेश वाकुडकर याच्या तीव्र शब्दात निषेध करीत असून संपूर्ण भारताच्या नागरीकांच्या भावना दुखवणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्याला अटक करा अशी तक्रार माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांचे मार्गदर्शनात भाजपा च्या वतीने जळगांव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. यावेळी निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ शहराध्यक्ष अभिमन्यू भगत भाजपा जिल्हा युवा मोर्चा सचिन देशमुख,राजेंद्र गांधी,रामेश्वर राउत, पंचायत समिती सभापती महादेवराव धुर्डे,निलेश शर्मा,राम इंगळे,अशोक काळपांडे, गुणवंत कपले,प्रतिक खिरोडकार, शरद खवणे,मोहित सरप,रमेश कोथळकार, अंबादास निंबाळकर, जयकुमार पारस्कर, शैलेंद्र बोराडे, मंगेश बावस्कर, कैलास डोबे, राम शिंदिकर, पुरुषोत्तम खत्ती, सुधीर ठाकरे, अरुण खिरोडकार,सुरेश इंगळे,संजय देशमुख, यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे विविध आघाडीमधील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आदी भाजपा तालुका, शहर, भाजयुमो, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसूनगाव गट ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान उसरा येथे शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील यांच्यावर हल्ला
Next articleउद्या मतमोजनी .निकालाची उत्सुकता शिगेला !उमेदवाराची धाकधूक वाढली !प्रशासन सज्ज !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here