भारतीय जनता पार्टी च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको आंदोलन 

 

आज ५ फ्रेबुबारी रोजी भारतीय जनता पार्टी संग्रामपूर तालुक्याच्यावतीने लॉकडाऊन च्या काळात महविकास आघाडी सरकारद्वारे वीज देयके कमी करण्यात येतील व १०० युनिट वापरा पर्यंत शेतकरी बांधवांचे वीज देयके माफ करण्यात येतील अशी घोषणा ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी केली होती परंतु आता वीज देयके तर माफ करण्यात आली नाहीतच उलट दिलेली वीज देयके भरावेच लागतील असे मा.ऊर्जा मंत्री यांनी जाहीर केले व राज्यातील ७८ लाख वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे तसेच शेतकऱ्यांना डि पी जळाल्यानंतर थकित वीज बिलांच्या ८० टक्के रक्कम भरल्यानंतरच डिपी देण्यात येईल असे आदेश दिले याविरोधात
आज५ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र भर ताला बंद व हल्ला बोल आंदोलन सब स्टेशन वीज वितरण कार्यालय संग्रामपूर येथे करण्यात आले ह्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकेश राठी जिल्हा सदस्य डॉ गणेश दातीर मा सभापती पांडुरंग हागे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव भारसाकडे विलास इंगळे यांनी भाषणातुन राज्य सरकारला धारेवर धरलेवर सदर आंदोलन *माजी कॅबिनेट मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.डॉ.संजयजी कुटे* यांच्या नेतृत्वात करण्यात आले ह्यावेळी सभापती सौ नंदा ताई हागे ,अंबादास चव्हान ,उध्वराव व्यवहारे ,सुभाष हागे, प्रमोद गोसावी ,राजेश मुयांडे, सुधाकर शेजोळे ,भगवान राठी, अविनाश धर्माळ ,संजय उमाळे, रविन्द्र झाल्टे ,गुनवंत खोडके ,गजानन मानखैर, नारायण अवचार, विशाल लोणकर ,भास्कर धुळे ,भागवतराव मारोडे ,संजय कौलकार ,संजय ठाकरे सह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment