भारत जोडो यात्रा शेगावात दाखल सभेच्या आधीच ,अनेक संभ्रम आणि यात्रा जोडो की तोडो असा लोकांना प्रश्न बघुया सत्यता ,

 

विठ्ठल अवताडे प्रतिनिधि

आज शेगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील समारोप होणार आहे , या निमित्ताने गेल्या २१ दिवसापासून सगळे नेते शेगाव शहरात तळ ठोकून दिसलेत ,भव्य दिव्य स्वरूपात सभा आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी शेगाव शहरता होईल याची दाट शक्यता होती , तश्याताच दोन दिवस आधी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी माहविकास आघाडीच्या नेत्यांनी या सभेचे निमंत्रण दिल्यामुळे सभेला राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब येणार अशी चर्चा झाली आणि काही प्रसारमाध्यमांच्या बातम्या ही दिसल्या , तर बंदोबस्त करण्यासाठी पोलिस प्रशानाचा ताफा इतका होता की छावणीचे स्वरूप झाले होते , शहरातील वाहतूक ही दुपारी १२ नंतर बंद करण्यात आली आणि शहराच्या चारही बाजूंनी पार्किंग वेवस्था करण्यात आली , सकाळी जवळ येथे खा, राहुल गांधी यांचे आगमन झाले परंतु महविकसं आघाडीचे इतर मोठे नेते वृतलीहे पर्यंत पोहचले नाहीत तर सभेची वेळ तीन वाजता होती त्यामुळे महाविकसं आघाडीचे मोठे नेते येतीलच की नाही ? हा संभ्रम लोकांमध्ये दिसतो शिवाय गर्दी प्रचंड प्रमाणात दिसत असली तर संख्या बळ रेकॉर्ड ब्रेक असेल का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आणि भारतीय जनता पक्ष यांच्या कडून काळे झेंडे दाखवण्याचे आणि राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावरील टिके साठी माफी मागावी अशी मागणी असताना काही प्रमाणात सभेसाठी आलेल्या लोकांना मानसिक त्रास ही सहन करावा लागत आहे तर गैर सोय होत असल्याचे समजते आहे त्यामुळे ही सभा आता नक्की इतिहासिक ठरते का हे बघण्या सारखे आहे , लवकरच पुढील उपडेत आम्ही सूर्या मराठी न्यूज कडून प्रसारित करू

Leave a Comment