मतदार यादी मध्ये चुकीचे नावे समाविष्ठ करणाऱ्यांवर कारवाई करा

 

मोताळा शहर भारतीय जनता पक्षाची मागणी

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा :- नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या मोताळा नगरपंचायत च्या निवडणूकीचा बिहुल वाजला असुन शहरातील 17 प्रभागा साठी आरक्षण जाहीर झाले असुन मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याच्या भेटी-गाठी सोबतच आपल्या प्रभागातील मतदारांची जुळवाजुळव केल्या जात आहे अश्यातच निवडणूकी च्या अनुषंगाने मोताळा शहरात चुकीच्या पद्धतीने खेड्या पाड्यातील मतदान मोताळा शहरात टाकल्या जात असुन चुकीच्या पद्धतीने नाव समाविष्ठ करणाऱ्यांवर कारवाई करावी या करिता आज 25 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्ष मोताळा शहराच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद आहे की आगामी काळात मोताळा नगरपंचायत च्या निवडणुका होणार आहे तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमा नुसार मतदार यादी मध्ये नावे नोंदविण्या बाबत कार्यक्रम जाहीर झाला आहे या अनुषंगाने मोताळा शहरातील काही राजकीय व्यक्ती व विशिष्ट पक्षाच्या नेत्यांनी खेड्या-पाड्यातील तसेच इतर मतदारसंघातील नावे मोताळा शहराच्या मतदान यादी मध्ये समाविष्ठ करण्याचा सपाटा लावला आहे या मध्ये येणाऱ्या मोताळा नगरपंचायत च्या निवडणुकी मध्ये ग्रामीण भागातील प्रत्येक प्रभागा मध्ये दोनशे ते तीनशे नावे समाविष्ठ करण्यासाठी कार्यक्रम गुप्त पणे आखला असुन या मध्ये काही कर्मचारी व BLO यांच्या समावेश आहे शासनाने दिलेल्या नियमानुसार ज्या यादी भागामध्ये ज्याचे वय 18 वर्ष पुर्ण झाले असेल त्यांची च नावे समाविष्ठ झाली पाहिजे
त्यासाठी नमुना 6 भरून देने बंधनकारक आहे व नमुना नंबर 8 मध्ये ट्रान्स्फर बाबत नियमावली तयार करण्यात आली आहे परंतु येणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुका लक्ष्यात घेता ग्रामीण भागातील मतदाराकडून नमुना 8 सुद्धा भरून घेण्यात येत आहे फक्त आणि फक्त येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकी साठी सदर चुकीचे काम होत असुन हे अन्याय कारक आहे व राजकीय फायद्यासाठी सदरचे बेकायदेशीर कृत्य हे करण्यात येत आहे सदरच्या विषयांवर गंभीर दखल घेऊन मतदारांवर/कर्मचारी/BLO यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात यावे नवीन नाव समाविष्ठ करताना त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी सदरचे व्यक्तीचे वास्तव हे शहरात व त्या यादी भागामध्ये आहे काय ? त्याचा सबळ पुरावा शासकीय असणे बंधनकारक ठेवण्यात यावा त्यामध्ये त्याच्या परिवारातील व्यक्तीचे आधारकार्ड, मतदान कार्ड,नगरपंचायत ची टॅक्स पावती,पॅनकार्ड, हा पुरावा असल्याशिवाय नवीन नावाची नोंदणी करण्यात येऊ नये किंवा 18 वर्षावरील नाव नोंदण्यासाठी त्याच्या परिवारातील ठोस पुरावा सादर करणे बंधनकारक करावे सदरच्या प्रकरणाची आपण गांभीर्याने नोंद न घेतल्यास आम्हाला आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा गंभीर इशारा निवेदना च्या माध्यमातून देण्यात आला असुन निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्याधिकारी नगरपंचायत मोताळा याना देण्यात आलं असुन निवेदनावर तालुका अध्यक्ष यशवंत पाटील,मोताळा शहर अध्यक्ष गजानन मातळे,अमोल रुमाले,हसन शाह,नंदकिशोर कुकडे,प्रल्हाद लवगे,किशोर भगत,अशोक खर्चे, वासुदेव दसरकर,धनराज सोळंके,पवन सुरगडे यांच्या सह अन्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत

Leave a Comment