Home Breaking News मलकापूर पांग्रा येथे दोन दुकानांमधून चोरी !

मलकापूर पांग्रा येथे दोन दुकानांमधून चोरी !

448
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या चोरट्यांनी तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला असून तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे 22 नोव्हेंबरला मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याची घटना घडली !मलकापूर पांग्रा येथील अतुल दायमा यांचे श्री महालक्ष्मी एजन्सी नावाचे होलसेल दुकान आहे हे दुकान चोरट्यांनी 22 नोव्हेंबर च्या मध्यरात्री शटर चे कुलूप तोडून चोरी केली !यामध्ये रोख 30 हजार रुपये .इतर किराणा सामान संतूर साबण खाद्यतेल मसाला ‘सीसीटीव्ही व्हिव्हीआर ‘असा एकूण पाच लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला ।त्यानंतर चोरट्यांनी बशीर किराणा दुकान कडे मोर्चा वळवला बशीर दुकानाचे कुलूप कोंडा तोडून ‘दुकानातील रोख ४०हजार आठशे रुपये ‘त्याच बरोबर इतर किराणा सामान ‘संतूर साबण कपड्याचे साबण खाद्यतेलखोबरेल तेल शांती आवला शाम्पू .असे इतर आणखी किराणा सामानअसा एकूण एक लाख 95 हजार 600दोन्ही दुकानातील सामानाची किंमत सात लाख 22 हजार शंभर रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला !या घटनेची माहिती मिळताच साखरखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार जितेंद्र आडोळी साहेब ।बीट जमदार नारायण गीते ‘पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर हे घटनास्थळी दाखल झालेव घटनेचा पंचनामा करून बुलढाणा येथून श्वान पथकाला पाचारण केले !परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही !त्यामुळे आता चोर शोधणे पोलिसांपुढे आव्हान असेल !

Previous articleआदीवासी रूग्ण सेवा समीती जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने वसाळी येथे आरोग्य शिबिर संपन्न.-
Next articleविहिरीत पडलेल्या रोहिला युवकांनी दिले जीवनदान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here