योगेश नागोलकार
पातुर :-तालुक्यातील मळसूर येथे स्थानिक सोपीनाथ महाराज संस्थान मळसूर येथे दिनांक 29 ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंत आनंद अनुभूती शिबीर राहणार आहे. परमपूज्य श्री रविशंकर जी महाराज यांच्या संकल्पनेतून हे शिबिर मळसुर येथे घेण्यात येत आहे. या शिबिरामध्ये चिंतामुक्त मन विकार मुक्त तन संकोच रहित बुद्धी भूतकाळातील समस्या तान तनाव इत्यादीचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे सदर कार्यक्रमाचे प्रशिक्षक श्री संजय जी गाडेकर हे राहणार आहेत तरी परिसरातील महिला पुरुष वृद्ध इत्यादी लोकांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन आपले नाव म्हणून घेण्यात यावे असे आव्हान सोपीनाथ महाराज संस्थान चे अध्यक्ष दिलीप राव काळे सचिव पुखराज जैन यांनी केले आहे यावेळी मळसूर येथील प्रतिष्ठीत शिवाजीराव काळे अरुण देवकते अमोल राऊत विठ्ठल देवकते शिवाजी देवकते सरपंच डॉक्टर शंकर राठोड डॉक्टर नंदलाल कलंत्री जगराम राठोड धीरेंद्र पायघन सर अमोल देवकते मनोज कंकाळ आदी उपस्थित होते