Home Breaking News महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे संग्रामपुर तालुक्यात अवैध रेतीची तस्करी जोमात सुरू..मात्र कारवाई शून्य...

महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे संग्रामपुर तालुक्यात अवैध रेतीची तस्करी जोमात सुरू..मात्र कारवाई शून्य असून लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे

532
0

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून याकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या  बघायला मिळत आहे .जवळपासच्या नद्यांच्या पात्रातून उघडपणे रेतीची तस्करी होत आहे. शेकडो लहानमोठ्या वाहनांमधून ही चांगल्या दर्जाची रेती नेण्यात येतानाचे चित्र सर्रास दिसून येत आहे. महसूल विभागाच्या सहकार्याने हा अवैध कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नदीच्या पात्रावर मात्र 15 ते 20 फूट चे मोठ-मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.
महसुल विभागाकडुन कोणत्याच प्रकारची कारवाई दिसून येत नाही.

संग्रामपुर तालुक्यात बुलढाणा जिल्हा व अकोला जिल्ह्याच्या सिमेवर वाननदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या रेती वाहतूक होत असुन अकोला जिल्ह्यातील , तेल्हारा , माळेगाव , हिवरखेड , आकोट संग्रामपुर तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात नेण्यात येत आहे.
येथील नागरिकांनी कारवाईची मागणी केली वाण नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेती ची अवैधरीत्या वाहतुक करण्यात येत आहे ही होणारी वाहतुक थांबविण्यात यावी व रेती वाहतूक करणाऱ्या विरुध्द तत्काळ गुन्हे दाखल करावे.
वान नदी पात्रातून जे सी बी द्वारे मोठ मोठी खड्डे करुन अवैधरीत्या रेती उत्खनन केल्या जात असुन नदी पात्राचे मोठे नुकसान होत आहे तसेच शासनाचा महसूल पण बुडत आहे सदर रेती माफियांना संग्रामपुर महसूल विभागाचे अभय असुन महसूल शासनाच्या तिजोरीत जमा न होता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे , अधिकार्‍यांच्या संगनमताने अवैध रेती वाहतूक जोमात सुरू आहे.अशी चर्चा जनतेतून केली आहे.

Previous articleकटंगीची आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल;सरपंचसह गावकऱ्यांनी घेतला पुढाकार
Next articleपालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थित पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here