अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी
शेगावात रास्ता रोको आणि निदर्शने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस सतत केंद्र सरकराचा घेराव करत आली आहे. अशातच पुन्हा एकदा काँग्रेस केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस आज शुक्रवारी देशव्यापी आंदोलन पार पडले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात रस्ता रोको करीत निदर्शने करण्यात आली.
महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढीविरोधात काँग्रेसने आज शुक्रवारी देशभरात मोठ्या आंदोलनाची योजना आखली असून त्यामध्ये पक्ष राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार आहे. तर सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात खामगाव-अकोट या राज्यमहामार्गवर केंद्र सरकार विरोधात निदर्शने करीत रास्ता रोको करण्यात आला. शहर व तालुका काँग्रेस च्या वतीने आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, कैलाशबाप्पू देशमुख शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख, केशवराव हिंगणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.