महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल वांदिले यांचा अलखिदमत फाऊंडेशन ग्रुपच्या वतीने सत्कार

 

नईम मलिक हिंगणघाट

हिंगणघाट शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यउपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अतुल वांदिले यांची राजकीय कार्य कुशलता लक्षात घेऊन अतुल वांदिले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्तीच नियुक्ती करण्यात आली आहे.

आज शनिवारी अलखिदमत फाऊंडेशन ग्रुपच्या वतीने अतुल वांदिले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अलखिदमत फाऊंडेशन ग्रुप चे अध्यक्ष नुरुभाऊ शेख , सचिव नदिमभाई अली , व ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment